भारताच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनी मिळून अहमदाबादमधील मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान राजनैतिक संबंधांना ‘क्रिकेट डिप्लोमसी’च्या माध्यमांतून मोदी सरकार पाहत असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी गुरुवारी सकाळी अहमदाबादमधील मोटेरा येथिल नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिकेटचा आनंद घेतला. मोटेरा येथे निविनच बांधलेल्या 1.30 लाख प्रेक्षकांची क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानाला सामन्याअगोदर दोन्ही पंतप्रधानांनी फेरफटका मारला. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान अल्बानीज यांनी खेळाडूंची भेट घेतली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान अल्बानीज आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ही चौथी भेट आहे.
बुधवारी अल्बेनीज यांनी ऑस्ट्रेलिया आणि भारताने ऑस्ट्रेलिया- भारत शैक्षणिक पात्रता ओळख हा उपक्रम पुर्ण झाला असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी ऑस्ट्रेलियाचे डीकिन युनिव्हर्सिटी गांधीनगरमधील गिफ्ट सिटी येथे आंतरराष्ट्रीय कॅम्पस उभारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.