वृत्तसंस्था / हो ची मीन सिटी (व्हिएतनाम)
येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सुपर 100 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू तनिषा क्रेस्टो आणि ध्रुव कपिला यांनी मिश्र दुहेरीत उपांत्य फेरी गाठली आहे.
सहावी मानांकित जोडी क्रेस्टो आणि कपिला यांनी भारताच्या सतीशकुमार करुणाकरन् व आद्य वेरीनाथ यांचा 14-21, 21-10, 21-14 अशा गेम्समध्ये केवळ 44 मिनीटांत पराभव केला. या विजयामुळे क्रेस्टो व कपिला यांनी मिश्र दुहेरीची उपांत्यफेरी गाठली आहे.









