आयसोलेशनमध्ये सुचते ‘आउट ऑफ बॉक्स’ आयडिया
एकाकी झाल्यावर अनेक लोक कंटाळतात किंवा वैतागून जातात. तर रचनात्मक लोक स्वत:च्या कल्पनाविश्वात विहार करू लागतात. ते स्वत:च्या मेंदूला काही सकारात्मक करणे आणि सृजनाच्या दिशेने पळवू लागतात. एरिझोना युनिव्हर्सिटीच्या न्यूरो सायंटिस्ट जेसिका एंड्य्रूज हाना यांच्यानुसार लोक कशाप्रकारे विचार करतात, हे समजणे आरोग्य आणि तंदुरुस्तीला उत्तम करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यास आम्हाला संधी देते.
2 हजार लोकांवर झाले अध्ययन

एरिझोना, अरकांसास आणि मिनेसोटा युनिव्हर्सिटीच्या मनोवैज्ञानिकांनी 2 हजरा लोकांवर एक सर्वेक्षण केले आहे. लोकांकडे काही करण्यास विशेष नसताना ते कशाप्रकारे रचनात्मक राहतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणाद्वारे करण्यात आला आहे. संशोधकांनी 90 जणांना कुठल्याही डिजिटल उपकरणाशिवाय 10 मिनिटांपर्यंत एका कक्षात एकाकी ठेवले आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात कुठले विचार आले हे उघडपणे व्यक्त करण्यास सांगण्यात आले. एका अन्य परीक्षणात काही प्रश्न विचारात आउट ऑफ बॉक्स उपाय जाणून घेण्यात आले.
अनेक भागीदारांमध्ये निरर्थक विचारांमध्ये हवरून जाण्याची प्रवृत्ती होती. तर रचनात्मक लोकांमध्ये अधिक योग्य पद्धतीने विचार करण्याचे संकेत मिळाले. त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे स्वत:चे विचार व्यक्त केले. रचनात्मक लोक एकाकीपणादरम्यान कंटाळून गेले नाहीत असे मनोवैज्ञानिक क्वेंटिन राफेलीने सांगितले आहे.
सद्यकाळात व्यस्त आणि डिजिटल समाजात अडथळ्यांशिवाय स्वत:च्या विचारांसोबत एकटे राहण्याचा काळ दुर्लभ ठरला आहे. परंतु कामाचा भार, डिजिटल उपकरणांची सवय यातूनही प्रत्येकाने स्वत:च्या विचारांसोबत वेळ घालविण्याची संधी निर्माण करावी असे हाना यांनी म्हटले आहे.









