ग्रह-नक्षत्रांनुसार प्रत्येक प्रश्नाचे देणार उत्तर
को-स्टार ही टेक कंपनी आणि बजी अॅपने मिळून एक अनोखी मशीन तयार केली आहे. ज्याप्रकारे शतकांपासून ज्योतिषी गणना आणि राशिफलाची माहिती देण्यासाठी ग्रह-नक्षत्र आणि त्यांच्या स्थितीचा उललेख करतात, त्याचप्रकारे को-स्टार मशीनकडून ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीच्या आधारावर भविष्य वर्तविले जात आहे. या मशीनकरता याची गणना दैनंदिन एआयद्वारे तयार करविली जाते, जी ज्योतिषांच्या टीमकडून लिहिण्यात आलेल्या डाटाबेसची मदत घेते. मशीनमध्ये सोव्हियत युगातील कॉम्प्युटर, नासाकडून वापरली जाणारी उपकरणे आणि फोटो बूथ जोडण्यात आला आहे. सध्या या मशीनची सेवा मोफत आहे. मशीनला ओपन एंडेड प्रश्न विचारता येतात. या प्रश्नाच्या उत्तरादाखल माहिती स्लिप फॉर्मेटमध्ये मिळते, अशी माहिती को-स्टारच्या संस्थापिका बानू गुलेर यांनी दिली आहे. एआयला ज्योतिषाशी जोडणे कठिण होते, परंतु माझा कोडिंगचा अनुभव उपयुक्त ठरला. हा नवोन्मेष चमत्कारिक असल्याचे गुलेर यांचे सांगणे आहे. पूर्वी ज्योतिषावर माझा भरवसा नव्हता, परंतु यात एआयची मदत घेण्यात आल्याचे कळल्यावर भरवसा वाढल्याचे न्यूयॉर्कमधील 26 वर्षीय एना जॉन्स्काने सांगितले आहे. गणनेसाठी कंपनीने सॉफ्टवेअरचा वापर केला असून याची गणना अचूक आहे. एआयला योग्य माहितीद्वारे प्रशिक्षित करण्यात आल्यास त्याचा वापर करण्यास कुठलीच हरकत नसल्याचे वैदिक ज्योतिषातील तज्ञांनी म्हटले आहे.









