मात्र अद्यापही रस्त्यावरील दगड माती कायम
ओटवणे प्रतिनिधी
फुकेरी येथील शिवकालीन हनुमान गड रस्त्यावर अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडी आठ दिवसानंतर जेसीबीच्या सहाय्याने दूर करण्यात आल्या. मात्र काही ठिकाणी रस्त्यावर आलेली दगड माती जैसे थे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबाबत गडावर जाणाऱ्या पर्यटकांसह फुकेरी ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.गडावर जाणाऱ्या या रस्त्यासाठी सुमारे ९३ लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु पहिल्या पावसातच या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर यावर्षी या रस्त्याचे काम मार्गी लागल्यामुळे हनुमंत गडावर जाणाऱ्या पर्यटकांसह फुकेरी ग्रामस्थांमध्ये समाधान होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तसेच अंदाजपत्रकामुळे काम न केल्यामुळे पहिल्या पावसातच रस्त्यावर दरड कोसळण्यासह रस्त्याची साईडपट्टीही खचली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन गडावर जाणारा हा रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी
पर्यटकांसह फुकेरी ग्रामस्थांनी केली आहे.









