प्रतिनिधी/ खेड
खेड तालुक्यातील निळीक-भुवडवाडी येथे मुसळधार पावसामुळे शनिवारी रात्री 10 च्या सुमारास 2 घरांवर दरड कोसळली. घरातील सर्व माणसे घराबाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र घराचे मोठे नुकसान झाले.
गेल्या 2 दिवसांपासून तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. याच मुसळधार पावसामुळे निळीक येथील सुनील सीताराम भुवड, अनिल सीताराम भुवड यांच्या घरावर अचानक दरड कोसळली. घरातील सर्व लोक जेवण करत होते. मोठा आवाज कानी पडताच सर्वजण प्रसंगावधान राखून घरातून बाहेर पळाले. त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र कोसळलेल्या दरडीमुळे घराच्या स्वयंपाकगृह व स्नानगृहाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. निळीक-भुवडवाडी येथे डोंगरावरती टप्प्याटप्प्याने घर वसली आहेत. डोंगर खचत चालल्यामुळे तेथील 4 घरांना धोका निर्माण झाल्याचेही तेथील ग्रामस्थांनी सांगितले.









