हॉस्पिटल इमारत व अंतर्गत रस्त्यांची होणार दुरुस्ती; शासनाकडून अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
कोल्हापूर प्रतिनिधी
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाची (सीपीआर) इमारत व अंतर्गत रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासनाने 43 कोटी 74 लाख इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे सीपीआर हॉस्पिटलच्या इमारतीची दुरुस्ती आणि अंतर्गत रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार असून चेहरामोहरा बदलणार आहे.
शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सीपीआर रुग्णलायाची इमारत व अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समितीने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने 43 कोटी 74 लाख रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदरचे काम पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असल्यास त्या विभागासह महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.









