श्रीराम सेना हिंदुस्थानचे पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : रस्त्यावर फिरणाऱ्या गायींमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात गायीही जखमी होताना दिसत आहेत. त्यामुळे या गायी त्वरित गोशाळेला हलवण्याची मागणी श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने करण्यात आली आहे. यासंबंधी शुक्रवारी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे. रस्त्यावर दिसणाऱ्या गायी मालकीच्या आहेत अशी माहिती मिळाली आहे. त्यांनी या गायींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी झटकली जात आहे. या गायींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांना त्वरित गोशाळेत हलवावे. अन्यथा श्रीराम सेना हिंदुस्थान-बेळगाव ग्रामीण ही संघटनाच हे काम करेल, असे निवेदनात स्पष्ट केले आहे. यावेळी मोनाप्पा दयानंद पाटील, राहुल मुचंडी, किरण पाटील, सचिन कदम, दिलीप कोंडुसकोप आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.









