महिलेची दरमहा 50 हजार कमाई
झुंझुनूजवळील अंगसर गावातील रहिवासी असलेल्या चंदा देवी 2009 पासून डेअरी फार्म चालवत आहेत. त्यांनी दोन गायी खरेदी करत आपला पशुपालन व्यवसाय सुरू केला. पुढे ही संख्या वाढत 20 पर्यंत वाढली. मात्र, काही कारणाने त्यांच्या अनेक गायीही कोणत्या ना कोणत्या आजाराने दगावल्या होत्या. आता त्यांच्या गोठ्यात फक्त चार गायी उरल्या आहेत. ज्यातून तिला भरपूर नफा मिळत आहे. सध्या तिच्याकडे फक्त 4 गायी आहेत मात्र या गायीपालनातून आपले नशीब पालटल्याची कबुली त्या देतात. सध्या महिन्याला किमान 50 हजारांहून अधिक कमाई त्या करत आहेत. इतकेच नाही तर आपल्या डेअरी फार्ममध्ये त्यांनी तिघांना रोजगार दिल्याने त्यांच्या कुटुंबाची गुजराणही त्यांच्यावरच आधारलेली आहे. चंदा देवी चार गायींपासून दररोज सुमारे 70 लिटर दूध विकतात. तिच्या गायींचे दूध वेगवेगळ्या दराने विकले जाते. थारपारकर आणि साहिवाल गायींचे दूध 70 ऊपये प्रतिलिटर दराने विकतात. तर उर्वरित दोन गायींचे दूध 40 ते 45 ऊपये प्रतिलिटर दराने विकले जाते. त्यांचे थारपारकर आणि साहिवाल गायींचे तूप 3,000 रुपये प्रति किलोने विकले जाते. चंदा देवी यांच्या डेअरी फार्मची खास गोष्ट म्हणजे 4 गायींच्या संगोपनासाठी त्यांच्याकडे तीन मजूर काम करतात. या गायींना दिवसातून एकदा आंघोळ घालणे, त्यांची राहण्याची जागा स्वच्छ करणे, वेळेवर चारा देणे यांच्यासह दूध काढण्यापर्यंत बरीच कामे करण्यात हे मजूर व्यस्त असतात. या डेअरी फार्ममधून सर्व खर्च उचलून महिन्याला 50 हजार ऊपयांची बचत होते. एवढेच नाही तर गायींना उच्च प्रतिच्या सुविधा देण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. सध्या त्यांचा चार गायींचा डेअरी फार्म सुस्थितीत सुरू आहे.









