सांगली, प्रतिनिधी
Sangli Crime News : कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार ज्ञानु खोत टोळीस जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.बसवराज तेली यांनी सांगली व सोलापूर जिल्ह्यातुन दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश पारीत केला आहे.आगामी गणेशोत्सव तसेच इतर सण व उत्सव शांततेत पार पडावेत,कोणताही अनुचित प्रकार घडु नये, गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे म्हणून ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
यातील हद्दपार टोळी प्रमुख ज्ञानु आण्णाप्पा खोत, ( वय-२३,रा. कोंगनोळी ) सदस्य सुरेश ऊर्फ अर्जुन महादेव पोतदार, (वय-२५ , रा.अग्रण धुळगांव), संदिप भारत पाटील, ( वय-२०, रा. कोंगनोळी), मारुती दादासो लिंगले, (वय- २२ वर्षे, रा. कोंगनोळी, ) या टोळीविरुद्ध सन २०२२ मध्ये शेतक-यांच्या गोठ्यातील जर्शी गायी लबाडीने चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी,जत सुनिल साळुंखे,संदेश नाईक परि. पो.उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,पोलीस निरीक्षक,कवठेमहांकाळ ज्योतीराम पाटील, उपनिरीक्षक, सिध्दाप्पा रुपनर, शिपाई दिपक गट्टे, हवालदार मनिषा बजबळे यांनी भाग घेतला. पोलीस अधीक्षकांनी आतापर्यंत तीन तोळ्यातील 28 आरोपींना हद्दपार केले आहे.









