Tiger hunter cow- शाहूवाडी तालुक्यातील परळी पैकी कासारवाडीत बिबट्याकडून पाळीव गायीची शिकार करण्यात आली. तुकाराम खोत यांच्या मालकीची ही गाय असल्याचे सांगण्यात येतंय.
ज्या ठिकाणी बॉक्साईट उत्खननासाठी काही कंपन्यांनी परवानगी मागितली आहे. याच ठिकाणी जंगल आणि मोठ्या गुहा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वाघ आणि बिबट्याचे अस्तित्व या ठिकाणी असल्याचे सिद्ध झाले आहे.त्याठिकाणीच गायची शिकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गायची शिकार बिबट्याकडून झाली असून वनविभागाने याठिकाणी जाऊन पंचनामा केला असल्याची माहिती दिली.









