बाउल भरून-भरून पितात लोक
जगात अशा अनेक डिश आहेत, ज्या पाहताच लोकांना उबग येतो. परंतु केवळ चीनचे लोकच खाण्या-पिण्याप्रकरणी अजब सवयी बाळगतात असे नाही तर अनेक देशांमधील लोक असे खाद्यपदार्थ खात असतात, ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. फिलिपाईन्समधील एक डिश याचपैकी एक आहे. फिलिपाईन्समध्ये लोक मोठ्या तावाने पपेतान पित असतात. या डिशचे नाव ा@ढन्सी वाटत असले तरीही प्रत्यक्षात हे शेणाचे सूप आहे. तेथील लोक शेणाचे सूप अत्यंत आवडीने फस्त करत असतात. या सूपमध्ये काही प्रमाणात मांसही मिसळले जाते. हे सूप गायीच्या शेणातून तयार केले जाते. या शेणात डायजेस्टिव्ह एंजाइम असतात. या सूपमध्ये भाज्यांसोबत मांसही कापून टाकले जाते. या सूपला तेथील लोक अत्यंत पसंत करतात. या सूपची चव काहीशी कडू असते. याचबरोबर यात अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो.









