मुंबई / ऑनलाईन टीम
केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याची परवानगी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने सिरम इन्सिट्यूटकडून कोव्हीशिल्ड लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या महाराष्ट्राला 20 कोटी लसींची गरज आहे. परंतू केंद्र सरकारच्या वाटपामुळे महाराष्ट्राला कमी लस मिळत असल्याचा आरोप केला जात होता. 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मुभा दिल्यामुळे 5.5 कोटी लसीची गरज नव्याने निर्माण झाली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी अदर पुनावाला यांच्याशी सविस्तर चर्चा केली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, सध्या कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. अदर पुनावाला यांनी 24 मे पर्यंत सिरममध्ये उत्पादित होणाऱ्या लसी केंद्र सरकारने अगोदरच बूक करून ठेवल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला 20 कोटी लस कधी मिळणार,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








