ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काही राज्यांमध्ये पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा मस्क सक्तीचे आदेश दिले आहेत. रोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती होऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले.
दरम्यान, आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. असा निर्णय या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. त्या दृष्टीने एक साधारण चर्चा झाली आहे.” असं आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले.
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, “जी पंचसूत्री आहे त्यानुसार कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आम्ही असं ठवरलं आहे की, पहिलं सूत्र म्हणजे तपासण्या, तर आज आपण २५ हजारांपर्यंत दररोज तपासण्या करत आहोत. ही २५ हजारांची तपासणी आम्ही निश्चितपणे वाढवू. कारण, किरकोळ स्वरुपात… महाराष्ट्र हे तसं जर पाहिलं तर मी म्हणेण खूप सुरक्षित झोनमध्ये आहे. चिंता करण्याची परिस्थिती अजिबात नाही आणि घाबरण्याचं देखील काही कारण नाही. याचं कारण म्हणजे ९२९ आज अॅक्टीव्ह केसेस आहेत, महाराष्ट्राने एका एका दिवशी ६५ ते ७० हजार केसेस बघितलेल्या आहेत. त्यामुळे एकंदर पर मिलियनमध्ये आपण खूप खाली आहोत. परंतु महाराष्ट्र मात्र पर मिलियन केसेसमध्ये केवळ सात आहे. म्हणजेच दर दहा लाखांमागे महाराष्ट्रात सात केसेस आहेत. त्यामुळे आज असा एकदम काळजी सारखा नक्कीच विषय नाही, एवढ मी जरूर सांगेन.”