वृत्तसंस्था/ लुसाने
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या किर्स्टी कॉव्हेंट्री यांनी सोमवारी मावळते अध्यक्ष थॉमस बाक यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. या पदावर नियुक्त झालेल्या त्या झिम्बाब्वे व आफ्रिकन देशाच्या पहिल्या महिला आहेत.
1976 ऑलिम्पिक तलवारबाजीत पदक मिळविलेल्या थॉमस बाक यांनी 2013-2025 पर्यंत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. बाक यांच्याप्रमाणेच कॉव्हेन्ट्री यादेखील ऑलिम्पिक पदकविजेत्या असून त्यांनी 2004 व 2008 मध्ये जलतरणात दोन सुवर्ण मिळविली होती.
थॉमस यांच्या कार्यकाळात पॅरीस, बीजिंग, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या. तर रशियन डोपिंग आणि क्रिमिया व युक्रेनवरील त्यांच्या आक्रमणांसह कोविड महामारीचा सामना करावा लागला होता. अध्यक्षपदाची जबाबदारी घेतलेल्या किर्स्टी कॉव्हेंट्री 2019 पर्यंत झिम्बाब्वे सरकारमध्ये क्रीडा आणि कला मंत्री म्हणून काम केले आहे. कॉव्हेंट्री म्हणाल्या की, ऑलिम्पिक चळवळ ही बहु-क्रीडा कार्यक्रम व्यासपीठापेक्षा खूपच जास्त आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्याची महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे लिंगभेद चाचणी, नाडा आणि वाडा डोपिंग याबाबत नवे निर्णय घेण्यात येतील आणि जगभरातील सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवे नियम जारी करण्यात येणार आहेत. याबरोबर 2036 मध्ये भारतामध्ये नियोजित असणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेबाबत त्यांची ठोस भूमिका राहणार आहे.









