Pune Crime News : अनैतिक संबंधातून चुलत दिराकडून वहिनीसह दोन चिमुकल्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. वैभव वाघमारे (वय-30) अस त्याचं नाव असून पोलीसांनी त्याला अटक केली आहे.२५ वर्षीय वहिनी अन् तिच्या ४ आणि ६ वर्षीय मुलाची हत्या केल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने पट्रोल टाकून तिघांचेही मृतदेह जाळून टाकले.पुण्यातील पिसोळी येथे ही घटना घडली.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार,
वैभव वाघमारेचे तिच्या वहिनीशी अनैतिक संबंध होते. मात्र वहिनीचे आणखी कोणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. यातून त्यांच्यामध्ये वाद झाला. वादानंतर रागाच्या भरात त्याने वहिनीला आणि तिच्या दोन्ही मुलांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर या तिघांचे मृतदेह घरातील कपडे, बेडशीट व लाकडच्या साह्याने पेट्रोल टाकून जाळले. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली . त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









