प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाणी न्यायालयांना 22 एप्रिलपासून दि. 21 मेपर्यंत सुटी होती. त्यामुळे आता सोमवार दि. 22 मे रोजी न्यायालये पुन्हा गजबजणार आहेत. सध्या उन्हाचा तडाखा असल्यामुळे सुटीमध्ये अनेकांनी घरीच विश्रांती घेतली. वकिलांसह पक्षकारही न्यायालयाकडे फिरकले नाहीत. केवळ जेएमएफसी आणि काही मोजकीच जिल्हा न्यायालये सुरू होती. त्यामुळे न्यायालयामध्ये गर्दी कमी दिसून आली.
आता सोमवारपासून पुन्हा सर्व न्यायालये सुरू होणार आहेत. बऱ्याच न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. काही न्यायालयामधील न्यायाधीशांच्या जागा रिक्त होत्या. त्याठिकाणी इतर न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे प्रभारी भार सोपविण्यात आला होता. आता प्रत्येक न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजालाही वेग येणार आहे.