पालक-शिक्षकांसह संबंधितांचे लक्ष
पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास आता केवळ आठवडाच बाकी राहिला असताना सदर वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करावे की नाही याचा निर्णय आज सोमवार दि. 24 मार्च रोजी होणार आहे. हा विषय न्यायालयात असून आज त्यावर अंतिम सुनावणी आणि निकाल देण्यात येणार आहे. न्यायालय कोणता निवाडा देते याकडे पालक-शिक्षक व शिक्षण क्षेत्राशी संबंधितांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्य सरकारने आणि शिक्षण खात्याने येत्या 1 एप्रिलपासून काही इयत्तांकरिता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे ठरविले असून त्यावर सरकार ठाम आहे. काही पालकांनी सदर निर्णयास विरोध करून शैक्षणिक वर्ष पारंपरिक पद्धतीनुसार जूनपासूनच सुरू करण्याची मागणी केली असून न्यायालयात आव्हान दिले आहे.









