3 वर्ष सश्रम कारावास, 11 हजाराचा दंड
रत्नागिरी प्रतिनिधी
लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथे 15 वर्षीय शाळकरी मुलींची छेड काढल्यापकरणी दोघांना न्यायायलयाने 3 वर्षे सश्रम कारावास व 11 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावल़ी आह़े हाजीबा बीरू फोंडे (20, बेळगाव, सध्या सापुचेतळे-लांजा) व चंद्रकांत बाळकृष्ण कोकरे (39, चांदोर तळेवाडी) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपिंची नावे आहेत़.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा सरकारी पक्षाकडून ॲड़ अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिल़े खटल्यातील माहितीनुसार पिडीत 3 मुली सापुचेतळे येथील शाळेत 9 वी मध्ये शिकत होत्य़ा शाळेतून घरी जात असताना काही मुले गाडीवरून येवून आपली छेडछाड करतात, मोबाईन नंबर मागतात, पाठीवर मारतात, अशी हकिगत पिडीत मुलींनी आपल्या पालकांना सांगितली होत़ी याची गंभीर दखल घेत मुलींच्या पालकांनी मुलींच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर पाळत ठेवली.
त्यानुसार 21 फेबुवारी 2022 रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास पिडीत मुली सापुचेतळे बाजारपेठेतून घरी चालत येत असताना रिक्षातून आलेल्या आरोपींनी मुलींची छेडछाड करण्याचा प्रयत्न केल़ा एकाने मुलीच्या दंडाला धरून रिक्षामध्ये ओढण्याचा प्रयत्न केल़ा मुलींनी आरडा-ओरडा केल्याने आरोपींनी रिक्षातून पोबारा केला, अशी तक्रार पिडीत मुलींच्या पालकांनी लांजा पोलीस ठाण्यात दाखल केली होत़ी याप्रकरणी पोलिसांनी आरोपिंविरूद्ध भादंवि कलम 354 (अ)(ब) व बालकांचे लैगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम 2012 चे कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल केल़ा.
पोलिसांच्या तपासामध्ये 2 मुले अल्पवयीन असल्याचे समोर आल़े अन्य आरोपी हाजीबा फोंडे व रिक्षाचालक चंद्रकांत कोकरे यांच्याविरूद्ध पॉक्सो न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल करण्यात आल़े गुन्ह्याचा तपास तात्कालीन उपनिरिक्षक तेजस्विनी पाटील यांनी केल़ा खटल्यादरम्यान एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आल़े पैरवी अधिकारी म्हणून कॉन्स्टेबल नरेश कदम यांनी काम पाहिल़े.