रत्नागिरी :
शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधरित्या वास्तव्य केल्याचा आरोप असलेल्या बांग्लादेशी महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल़ा सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहिल भोंबल (30, ऱा साळवी स्टॉप रत्नागिरी, मुळ ऱा बांग्लादेश) असे या महिलेचे नाव आह़े 17 जानेवारी 2025 रोजी तिला दहशतवाद विरोधी पथकाकडून ताब्यात घेण्यात आले होत़े तसेच तिच्याविऊद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा
मागील अडीच महिन्यापासून कारागृहात असलेल्या सलमा हिने जामीनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होत़ा सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिल़ा गुह्यातील माहितीनुसार सलमा ही 16 डिसेंबर 2016 रोजी 90 दिवसांचा विजा घेऊन भारतात आली होत़ी यावेळी तिचे वास्तव्य शृंगारतळी गुहागर याठिकाणी होत़े यानंतर सलमा हिने राहिल भेंबल याच्याशी विवाह केल़ा तसेच विसाची मुदत संपली असतानाही तिने 2017 ते 2025 या कालावधीत अवैधरित्या भारतात वास्तव्य केल़े या काळात सलमा हिने आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखल आदी बनावट कागदपत्रे तयार करत भारतात वास्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होत़ा सलमा हिला 17 जोनवारी रोजी शहरातील साळवी स्टॉप येथून अटक करण्यात आली होत़ी
सलमा हिच्या वकिलांनी न्यायालयापुढे सांगितले की, आरोपी ही एक महिला आहे, तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, न्यायालयाने जामीन दिल्यास पोलिसांच्या तपासकार्यात सहकार्य केले जाईल़ तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या अटी–शर्थीचे पालन आरोपी हिच्याकडून केले जाईल असे सलमा हिच्यावतीने न्यायालयापुढे सांगण्यात आल़े तर सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध करताना सांगण्यात आले की, आरोपी हिने केवळ भारतात अवैध वास्तव्य केले नाही, तर तिच्याकडून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत़ याकामी तिला अन्य कुणीतरी मदत केली असण्याची शक्यता आह़े आरोपिला जामीन देण्याचा अर्थ भारतात अवैध वास्तव्य करण्याची परवानगी देण्यासारखे आह़े वैध विसा नसताना भारतात वास्तव्य केलेले प्रत्येक मिनिट हा गुन्हा आह़े आरोपीला जामीन मिळाल्यास ती देश सोडून पळूण जाण्याची शक्यता आह़े त्यामुळे आरोपी हिला जामीन देऊ नये असे सरकार पक्षाकडून न्यायालयापुढे सांगण्यात आल़े








