सुल्तानपूर :
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयाने निवडणूक आचार संहितेच्या उल्लंघन प्रकरणाला सामोरे जाणाऱ्या केजरीवालांना विदेश दौऱ्यावर जाण्याची अनुमती दिली. अमेठीत प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी केजरीवालांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.









