अनेक वर्षांपासून एकाच रंगाचे पोशाख घालण्याचा प्रकार
जपानमध्ये राहणाऱया एका दांपत्याला परस्परांबद्दल इतकी आत्मियता आहे की ते दररोज एकसारखे कपडे परिधान करतात. या दांपत्याच्या विवाहाला 37 वर्षे झाली आहेत. विवाहापासून ते एकसारखे किंवा एकाच रंगाचा पोशाख परिधान करत आहेत. या दांपत्यामधील प्रेम विवाहाच्या इतक्या वर्षांनंतरही कमी झालेले नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढत चालले आहे.
अशाचप्रकारे फ्लोरिडाच्या एका जोडप्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हे जोडपे 52 वर्षापासून एकसारखे कपडे घालत आहेत. त्यांच्या नातवाने स्वतःच्या आजी-आजोबांची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या जोडप्याचे नाव फ्रान आणि ईडी गार्गिला असून त्यांना एक 17 वर्षीय नातू देखील आहे.

आम्ही नेहमीच भोवतालच्या वातावरणाला अनुरुप अशाप्रकारचे कपडे घालता असे बॉन यांनी म्हटले आहे. आम्हाला माध्यमांमध्ये स्टाइल आयकॉन म्हणून ओळखले जात असल्याने आनंद आहे, परंतु प्रत्यक्षात आम्ही स्वतःला याप्रकारे पाहत नाही. आम्ही साधारण आणि स्वस्त कपडे घालतो असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. जपानचे हे दांपत्य विवाहाच्या 37 वर्षांनंतरही अत्यंत रोमँटिक आहे.
मागील 37 वर्षांपासून एकसारखे किंवा मॅचिंग आउटफिट तयार करवून घेण्याचे काम या दांपत्याने केले आहे. त्यांचे इन्स्टाग्रामवर 633 हजार फॉलोअर्स आहेत. त्यांना विदेशात रोमँटिक कपल या नावाने ओळखले जाते. जपानच्या या दांपत्यातील पतीचे नाव बॉन आणि पत्नीचे नाव पॉन आहे. त्यांच्या छायाचित्रांना सोशल मीडियावर लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असतो.









