स्पेस वेडिंगची सुविधा कधी सुरू होणार जाणून घ्या
विवाह हा एखाद्याच्या आयुष्यातील अत्यंत खास दिवस असतो आणि प्रत्येकाला हा दिवस अधिक खास करायचा असतो. कित्येकजण विवाहाचा दिवस खास ठरावा म्हणून वेगवेगळ्या कल्पना राबवत असतात. कुणी डोंगरदऱ्यांमध्ये लग्नगाठ बांधते, तर कुणी समुद्रकिनारी, डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन आखत असते. परंतु आता तुम्ही पृथ्वीपासून 1 लाख फूट उंचीवर अंतराळात जाऊन विवाह करू शकता. ही कल्ना लवकरच सत्यात उतरणार आहे.
स्पेस पर्स्पेक्टिव्ह ही कंपनी जोडप्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस अधिक खास करण्याची संधी देणार आहे. अंतराळात विवाहाची स्वप्नवत वाटणारी कल्पना सत्यात आणण्याचे काम ही कंपनी करणार आहे. प्रशस्त खिडक्यांनी सुसज्ज कार्बन-न्यूट्रल फुगा तयार करत ही कंपनी तो पृथ्वीच्या कक्षेत पाठविणार आहे. या प्रशस्त खिडक्यांद्वारे तुम्हाला पृथ्वीवरील सुंदर दृश्यांचा आनंद घेता येणार आहे.

कंपनीनद्वारे नेपच्यून अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात येते. कार्बन फूटप्रिंटचा वापर न करता अक्षय हायड्रोजन ऊर्जेचा याकरता वापर करण्यात येतो. अंतराळाचे 6 तासांचे उ•ाण सर्वात आश्चर्यकारक असणार आहे. हे अंतराळयान पाहुण्यांना पृथ्वीपासून 1 लाख फुटांच्या उंचीवर घेऊन जाऊ शकते आणि पुन्हा खाली आणू शकते. ही सुविधा 2024 पर्यंत सुरू करण्याची योजना आखली जात आहे. तसेच याच्या पहिल्या 1 हजार तिकिटांची विक्री देखील झाली आहे.
कोणत्या सुविधा मिळणार?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार लोक फ्लाइटदरम्यान कॉकटेलचा आनंद घेऊ शकतात. तसेच सहप्रवाशांसोबत गप्पा मारण्यासह स्वत:ची प्लेलिस्ट निवडू शकतात. या कॅप्सूलमध्ये अविस्मरणीय दृश्यांसह संपूर्ण सुसज्ज स्वच्छतागृह आहे. स्पेस लाउंजमधून अंतराळयानाच्या सर्वात मोठ्या खिडक्यांमधून 360 डिग्रीमध्ये अंतराळातील आश्चर्यकारक दृश्यांचा आनंद घेता येणार असल्याचे कंपनीच्या वेबसाइटवर नमूद आहे.
उड्डाणादरम्यान मेन्यू आणि कॉकटेल, ऑनलाइन बोर्ड, साउंडट्रॅक आणि लाइटपर्यंत सर्व गोष्टींसाठी वैयक्तिक प्राधान्य दिले जाणार आहे. एक्सप्लोरर्सनी जर एक पूर्ण कॅप्सूल आरक्षित केल्यास त्यांना लाउंजच्या मॉड्युलर डिझायनिंगमध्ये बसण्याच्या रचनेत बदल करू शकतात आणि आतिथ्यासाठी अतिरिक्त सुविधा समाविष्ट करू शकतात. फ्लाइटदरम्यान पृथ्वीची वक्रता, अंतराळातील अंधार आणि वातावरणाची पातळ निळी रेषा पाहण्यासाठी आणि अंतराळवीरासारखा उत्कृष्ट अनुभव प्राप्त करण्यासाठी दोन तास मिळतील.
सुरक्षित ठरणार प्रवास
नेपच्यून अंतराळयान नवविवाहित जोडप्यांना एक संस्मरणीय अनुभव देणार आहे. अंतराळात विवाह करू पाहणाऱ्यांची यादी दिवसेंदिवस मोठी होत चालल्याचे उद्गार स्पेस पर्स्पेक्टिव्हचे सह-संस्थापन जेन पॉयन्टर यांनी काढले आहेत. नेपच्यून अंतराळयानाची कॅप्सूल लिफ्टऑफपासून स्प्लॅशडाउनपर्यंत संपूर्ण उ•ाणासाठी सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.









