प्रतिनिधी/ बेंगळूर
चिटफंडच्या नावाखाली कोट्यावधी ऊपये गोळा करणाऱ्या दाम्पत्याने जनतेची फसवणूक करून पैसे घेऊन पळून गेले आहेत. ही घटना बेंगळूरच्या जरगनहळ्ळी येथे घडली. सदर दाम्पत्याने चिटफंडच्या नावाखाली सुमारे 40 कोटी ऊपये पैसे घेऊन पळून गेले आहे. जरगनहळ्ळी येथे 20 वर्षांपासून राहणाऱ्या या दाम्पत्याने चिटफंडच्या नावाखाली 600 हून अधिक लोकांकडून पैसे घेतले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवलेल्या लोकांनी त्यांना 5 ते 10 लाखांपर्यंतचे पैसे दिले आहेत. सुऊवातीला चिटफंडचे पैसे देणारे हे दाम्पत्य गेल्या एक वर्षापासून ग्राहकांना पैसे न देता चालढकल करत होते. गेल्या महिन्याच्या 3 जून रोजी हे दाम्पत्य फरार झाले आहे. या संदर्भात पुट्टेनहळ्ळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दाम्पत्याला अटक करण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.









