दिनांक 29-05-2022
मेष
या आठवडय़ाचा उपयोग तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याकरता आणि नियोजन करण्यामध्ये आपण कुठे चुकतो हे पाहण्याकरता करावा असा संदेश आहे. काही ठरलेल्या योजना आयत्या वेळेला रद्द होऊ शकतात. परिवारामध्ये प्रत्येकाची मर्जी सांभाळणे अवघड जाईल. पुढच्या काळाचे आर्थिक नियोजन आत्ताच करणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवन ठीकठाक असेल.
वाहत्या पाण्यात पाच नाणी सोडावीत.
वृषभ
कोणत्याही बाबतीमध्ये नुकसान होऊ नये या करता येणाऱया आठवडय़ात सावध राहण्याची गरज आहे. खास करून पैशांच्या बाबतीत. ज्यांना पैसे उधार दिले आहेत त्यांच्याकडून परत मागताना सगळय़ा प्रकारे प्रयत्न करण्याची गरज आहे. कामधंद्याच्या ठिकाणी थोडे नुकसान संभवते. नात्यांमध्ये रुसवा-फुगवा येऊ शकतो. काही बाबतीत वैवाहिक जोडीदाराचा सल्ला मानावा.
गरजूला आर्थिक मदत करावी.
मिथुन
जर काही कामे तुम्ही बाजूला ठेवून नंतर करावी असा विचार करत असाल तर नुकसान होऊ शकते. सध्या हातातल्या कामावर लक्ष केंद्रित करा. यश संपादन करा. या आठवडय़ात काही नवीन बदल होऊ शकतात जे कामासंबंधी असू शकतील किंवा लोकांशी तुमच्याशी असलेल्या व्यवहाराशी असू शकतील. आध्यात्मिक विचार मनात येतील.
सरकारी जमिनीवरील झाडांना पाणी घालावे.
कर्क
जे वाद सामंजस्याने मिटवले जाऊ शकतात त्याकरता बळाचा उपयोग टाळलेला बरा. कामासाठी दुसऱया ठिकाणी प्रवास घडेल. सूचक स्वप्ने पडू शकतात. नवीन लोकांचा संपर्क फायदेशीर ठरेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. या सगळय़ा व्यापामध्ये एक ना धड भाराभर चिंध्या असे होऊ देऊ नका. स्वभावामध्ये आक्रमकता येऊ शकते.
पक्ष्यांकरिता पाण्याची सोय करा.
सिंह
या आठवडय़ामध्ये ध्येय प्राप्तीकरता विशेष प्रयत्न कराल आणि त्यात यशही मिळेल. छोटी मोठी कामे आरामात पूर्ण होतील. काही वेळेला अपेक्षा नसताना मदत मिळेल. ज्या ठिकाणी काम नक्की होईल असे वाटेल तिथे अनपेक्षित अडचण येऊ शकते. मित्र-मैत्रिणींसोबत किंवा घरच्या नातेवाईकांसोबत काही काळ आनंदात घालवाल.
पाच लवंगा जवळ ठेवाव्यात.
कन्या
गेल्या काही काळामध्ये ज्या अडचणींचा सामना तुम्ही केला आहे त्यामुळे तुम्हाला एकाकीपणा वाटू शकतो. कामामध्ये हवा तेवढा उत्साह दाखवता न आल्यामुळे कामे बिघडू शकतात. पूर्वीच्या अनुभवामुळे खचून न जाता नव्या उमेदीने कामे पूर्ण करावी असा संदेश आहे. व्यापारात किंवा कामात पूर्वी घडलेल्या चुका परत होऊ शकतात. परिवाराकडून हवे तसे सहकार्य मिळणार नाही.
अशोकाच्या झाडाखालची माती जवळ ठेवा.
तूळ
या आठवडय़ामध्ये अनपेक्षितरित्या आलेल्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या अडचणी कामाच्या ठिकाणी असू शकतात किंवा परिवारातील सदस्यांच्या बाबतीत असू शकतात पण या अडचणींवर तुम्ही मात कराल. थोडी मानसिक शांतता लाभावी असेही तुम्हाला वाटेल. काही बाबतेत भ्रमनिरासही होईल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्मयताही आहे.
तुरटीने दात साफ करावेत.
वृश्चिक
या आठवडय़ामध्ये तुमच्या कामाची पद्धत तुम्हाला बदलावी लागेल. पूर्वीच्या कामाच्या पद्धतीतील त्रुटी शोधून त्यावर काम कराल. पैशांची आवक सर्वसामान्य असेल. एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. व्यावसायिक संबंधांमध्ये भावनेला मध्ये येऊ देऊ नका. जोडीदाराशी सुसंवाद साधल्याने बऱयाच अडचणी दूर होतील. काही निर्णय बदलावे लागू शकतात.
गरजूला वस्त्रदान करा.
धनु
नको त्या व्यक्तींचा सहवास लाभल्याने चिडचिड होऊ शकते. तुमच्या मनाप्रमाणे कामे न झाल्याने उत्साह कमी होऊ शकतो. या आठवडय़ामध्ये हलगर्जीपणा आणि आळस हा टाळायलाच पाहिजे. हातात असलेल्या कामांना प्राधान्य दिल्याने कामे पूर्ण होतील. परिवारातील एखाद्या व्यक्तीची आर्थिक निकड भागवावी लागेल. वैवाहिक जीवन समाधानकारक असेल.
लहान मुलांना बत्तासे वाटावेत.
मकर
या आठवडय़ामध्ये मानसिक गोंधळ वाढण्याची शक्मयता आहे. परिवारातील व्यक्तींमध्ये गैरसमज होऊ शकतात. शक्मयतो कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा. जामीन राहणे महागात पडू शकते. काही बदल अपरिहार्य असतील. पूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. आयत्यावेळी कोणीतरी मदतीला धावून येईल.
धार्मिक स्थळांमध्ये बदाम वाटावे.
कुंभ
काही कामे अगदी जलद होतील तर काही रेंगाळतील. या सगळय़ा गोंधळामध्ये नियोजन चुकणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या मतांचा स्वीकार केल्याने परिवारातील समस्या दूर होतील. कुटुंबसुख चांगले मिळेल. काही व्यक्तींच्या मदतीमुळे फायदा होईल. विचार व्यक्त करण्याकरता प्रयत्न करावा लागेल.
निळय़ा रंगाची फुले जमिनीत गाडावीत.
मीन
दुसऱयांना दिलेल्या उपदेशाप्रमाणे आपणही चालले पाहिजे याची जाणीव तुम्हाला या आठवडय़ामध्ये होऊ शकते. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्यावर आळ घेतील असे काही होऊ देऊ नका. महत्त्वाच्या घटनेला सामोरे जावे लागू शकते आणि ही घटना फायद्याची ठरेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱयांच्या व्यवहारामध्ये लक्ष घालू नका किंवा दुसऱयांबद्दल बोलू नका.
धार्मिक स्थळी दुधाचे दान द्यावे.
टॅरो उपाय ः नात्यांमध्ये कडूपणा आला असेल तर बासील पावडर (वाळलेल्या तुळशीची पावडर) जळत्या निखाऱयावर घरभर फिरवावी.





