गरीब गुणवंत विद्यार्थ्यांवर होणार अन्याय : 15 जून रोजी सीईटीचा निकाल जाहीर करण्याचे घोषित
मच्छे : कर्नाटक परीक्षा प्राधिकरण (केईए)ने कॉमन एंट्रन्स टेस्ट (सीईटी) निकाल जाहीर होण्यापूर्वी खासगी महाविद्यालयांच्या अभियांत्रिकी जागांसाठी घेण्यात आलेल्या कॉमड-के परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. तसेच कौन्सिलिंगला सुरुवात केल्याने अडचणी निर्माण झाल्या असून गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. गरीब विद्यार्थी सीईटीद्वारे जागा मिळण्याची वाट पाहत आहेत. याआधी कॉमेड-के कौन्सिलिंग केल्यास हुशार विध्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयात जागा मिळतील. पण गरीब मुलांना एकही जागा मिळाणार नाही, तरी सीईटी समुपदेशनाची माहिती नसल्याने सीट बुक करणे कठीण होईल. यामुळे कॉमेड-के जागा अपरिहार्यपणे स्वीकारण्याची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
कॉमेड-केने शनिवारी निकाल जाहीर केला आहे. केईएने 15 जून रोजी सीईटीचा निकाल जाहीर करण्याचे घोषित केले आहे. कॉमेड-केने कौन्सिलिंग प्रक्रियेसाठी नोंदणी करण्याचा सल्ला दिला असून केईएने 11 जूनपासून प्रक्रिया सुरू केली आहे. 14 ते 16 जून दरम्यान जागा वाटपाच्या पहिल्या फेरीची घोषणा केली जाईल, असे वेळापत्रक त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केले आहे. गेल्या वर्षी उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण यांनी कॉमेड-के पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन गरीब विद्यार्थ्यांच्या हितासाठी-सीईटी कौन्सिलिंग पूर्ण झाल्यानंतरच कॉमेड-केचे कौन्सिलिंग करावे, अशी सूचना केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी एक दिवसाच्या अंतराने सीईटी आणि कॉमेड-के कौन्सिलिंग घेण्यात आले. यावर्षी कॉमेड-केमध्ये पहिल्या 10 मध्ये आलेले विद्यार्थीदेखील सीईटीकडे लक्ष केंद्रित केले आहेत. तसेच सीईटीच्या निकालानंतरच जागा कुठे मिळवायची याबाबत निर्णय घेणार आहेत. सीईटीचा निकाल 15 जून रोजी जाहीर होणार असला तरी किमान 20 जून नंतर नोंदणी व पडताळणी सुरू होईल. त्यानंतर 20 दिवस पुनरावलोकन केले जाईल, जोपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल तोपर्यंत कॉमेड-के कौन्सिलिंग सुरू केले जाईल. शुल्क निश्चिती प्रलंबित दरवर्षी खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये शुल्क वाढीची मागणी करतात. त्यानंतर सरकारशी चर्चा करून फी निश्चित करतात. यावर्षी अद्याप फी निश्चित करण्यात आलेली नाही. खासगी कॉलेजच्या युनियनने शुल्कवाढीसाठी निवेदन देण्याची तयारी केली आहे. गेल्यावर्षी सरकारी कॉलेजमध्ये 38,200 रु. आणि सरकारी कोट्यातील जागांसाठी 98,984 रुपये शुल्क निश्चित केले होते. तर कॉमेड-केचे शुल्क 1.37 लाख ते 3.80 लाख रुपये इतके आहे.
सीईटीला प्रथम प्राधान्य
जर मला सीईटीमध्ये जागा मिळाली तर कमी फी भरावी लागेल. त्यामुळे सीईटीला प्रथम प्राधान्य आहे. मग कॉमेड-के चा विचार करता येईल. सीईटीसाठी लवकरात लवकर कौन्सिलिंग केले तर बरे होईल.
– एक विद्यर्थिनी
गरीब गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही
सीईटीचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, प्राधिकरण नावनोंदणी पडताळणीसाठीही सज्ज आहे. गरीब गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही.
-डॉ. एम. सी. सुधाकर, उच्च शिक्षणमंत्री









