पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्याबरोबरच 85 अधिकाऱयांची नियुक्ती करण्याचा आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाचा जोर वाढल्याने पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून 2 हजार नागरिकांना राहण्याची व्यवस्था विविध निवारा केंद्रांमध्ये करण्याची तयारी केली आहे. तसेच शहरातील विविध भागात पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्यासह 85 अधिकाऱयांची नियुक्ती करण्याचा आदेश महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी दिला आहे.
आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. नदी-नालाकाठावरील वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. 2019 मध्ये शहरातील विविध भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले. तसेच जिल्हय़ातील विविध भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना शहरातील पुनर्वसन केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यात आले होते. शहरात विशेषतः ब्रह्मनगर, मजगाव, महालक्ष्मी कॉलनी, आंबेडकरनगर, अनगोळ, समर्थनगर, मलप्रभानगर, मंगाईनगर, वडगाव, इंद्रप्रस्थनगर, गजानन महाराजनगर, मणियार ले-आऊट, चौगुलेवाडी, गांधी कॉलनी, एम. जी. कॉलनी, जयनगर, तांबिट होसूर, शास्त्रीनगर, हुलबत्ते कॉलनी, कसाई गल्ली खड्डा, शाहूनगर, संगमेश्वरनगर, वंदना कॉलनी, न्यू गांधीनगर, उज्ज्वलनगर, वंटमुरी कॉलनी, आश्रय कॉलनी, ऑटोनगर, रुक्मिणीनगर, यमनापूर अशा विविध भागात नाल्याचे पाणी शिरल्याने पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मनपाने शहर व उपनगरात 19 ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. 2120 नागरिकांना राहण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था करण्याचा आदेश आयुक्तांनी बजावला आहे. तसेच महापालिकेचे सामान्य उपायुक्त आणि महसूल उपायुक्तांसह 85 अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे.
पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना पुनर्वसन केंद्रात स्थलांतर करून त्यांच्या आरोग्य तपासणीसह राहण्याची व अन्न-पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी मनपा अधिकाऱयांवर सोपविली आहे.
पूरपरिस्थिती निर्माण होणारा परिसर | पुनर्वसन केंद्राचे ठिकाण | व्यक्ती मर्यादा |
ब्रह्मनगर, मजगाव, महालक्ष्मी कॉलनी, पाटील गल्ली, मजगाव. | सुख-शांतीभवन, खानापूर रोड, उद्यमबाग | 60 नागरिक |
आंबेडकरनगर अनगोळ | आदिनाथ भवन, वाडा कंपाऊंड, अनगोळ संपर्क क्रमांक 8095737843 | 100 नागरिक |
समर्थनगर, मलप्रभानगर, मंगाईनगर, वडगाव, जयनगर. | जेल शाळा, वडगाव संपर्क क्रमांक 8073163822 | 60 नागरिक |
समर्थनगर, मलप्रभानगर, मंगाईनगर, वडगाव, जयनगर. | अन्नपूर्णेश्वरी मंगल कार्यालय, येळ्ळूर रोड, वडगाव संपर्क क्र. 8310536717 | 300 नागरिक |
इंद्रप्रस्थनगर, गजानन महाराजनगर,मणियार ले-आऊट,चौगुलेवाडी, गांधी कॉलनी, एम. जी. कॉलनी | कैवल्य योग मंदिर, मंडोळी रोड संपर्क क्र. 9448814574 | 100 नागरिक |
समर्थनगर, मलप्रभानगर, मंगाईनगर, वडगाव, जयनगर. | साई भवन, जुना धारवाड रोड, खासबाग संपर्क क्र. 9448401384 | 300 नागरिक |
तांबिट गल्ली, होसूर | जयवंती मंगल कार्यालय, खासबाग, जुना धारवाड रोड संपर्क क्र. 9632613665 | 100 नागरिक |
शास्त्रीनगर, हुलबत्ते कॉलनी | दैवज्ञ मंगल कार्यालय, शास्त्रीनगर, महात्मा फुले रोड | 100 नागरिक |
कसाई गल्ली, खड्डा | कोनवाळ गल्ली, गेस्टहाऊस अंगणवाडी | 50 नागरिक |
शाहूनगर, संगमेश्वरनगर, वंदना कॉलनी | आंबेडकर भवन, नेहरूनगर संपर्क क्र. 9956692090 | 100 नागरिक |
न्यू गांधीनगर, उज्ज्वलनगर | केपीटीसीएल हॉल, शिवबसवनगर | 300 नागरिक |
न्यू गांधीनगर, उज्ज्वलनगर | विद्याधिराज भवन, रामनगर | 200 नागरिक |
न्यू गांधीनगर, उज्ज्वलनगर, कसाई गल्ली, खड्डा. | धर्मनाथ भवन, रामनगर, बेळगाव संपर्क क्र. 9956692090 | 200 नागरिक |
वंटमुरी कॉलनी, आश्रय कॉलनी | बालभवन, माळमारुती वसाहत संपर्क क्र. 74883368500 | 50 नागरिक |
वंटमुरी कॉलनी, आश्रय कॉलनी | महांतेश भवन, महांतेशनगर संपर्क क्र. 9901400730 | 100 नागरिक |
ऑटोनगर, रुक्मिणीनगर | समुदाय भवन, रामतीर्थनगर संपर्क क्र. 9448907517 | 50 नागरिक |
यमनापूर, मुत्यानट्टी | वाल्मिकी भवन, यमनापूर | 50 नागरिक |
कणबर्गी परिसर | लक्ष्मी गार्डन हॉल, कणबर्गी रोड संपर्क क्र. 9916764899 | 50 नागरिक |
ऑटोनगर, रुक्मिणीनगर | वेलकम् हॉल, कणबर्गी रोड संपर्क क्र. 9880322867 | 50 नागरिक |