मुंबई: देशात मास्क बंदी केली नसली तर खबरदारी म्हणून आता प्रत्येकाला मास्क वापरावा लागेल अशी चिन्ह दिसू लागली आहेत. कारण गेल्या 24 तासांत देशात (Coronavirus) 7240 नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात एकूण 2,701 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती, मात्र बुधवारी एका दिवसांत देशात पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरणार की, काय? अशी भिती व्यक्त होत आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशात 7240 नवीन रुग्ण आढळले असून, सक्रिय रुग्णांची संख्या 32 हजार 490 झाली आहे. त्यापैकी 2,701 रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळून आले आहेत. ही गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. तर मुंबईतही दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
महाराष्ट्रात दिवसाला 700 ते 800 रुग्णांची वाढ होत आहे. यात मुंबईमध्ये याची संख्या अधिक आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 1765 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी 83 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. बुधवारी 739 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 866 झाला आहे.
सर्वाधिक सक्रीय रुग्ण
मुंबई -7000
ठाण्यात 1482
पुण्यात 650
अहमदनगर 13
रायगड 253
पालघर 181
रत्नागिरी 17
सिंधुदुर्ग 10
नागपूर 58
चंद्रपूर 11
वाशिम 13
औरंगाबाद 11
नाशिकमध्ये 35 सक्रीय रुग्ण आहेत.
इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे.
राज्यात एकूण 2701 सक्रिय रुग्ण आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








