दिवसभरात 168 बाधित, 932 सक्रीय रुग्ण
प्रतिनिधी /पणजी
कोरोनाच्या चौथ्या लाटेने आता हळूहळू आपला प्रभाव दाखवण्यास प्रारंभ केला असून सर्वप्रथम एक, त्यानंतर दोन बळी करताना मंगळवारी तिघांचे बळी गेले आहेत. त्याद्वारे आतापर्यंतच्या बळींची संख्या 3838 वर पोहोचली आहे. त्याशिवाय सक्रिय रुग्णसंख्या 932 एवढी नोंद झाली आहे.
मंगळवारी दिवसभरात 1381 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 168 बाधित सापडले. त्या सर्वांना गृहविलगीकरण देण्यात आले आहे. 24 तासात 156 रुग्ण बरे झाले आहेत तर एकाला इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे. राज्यातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या 248339 वर पोहोचली आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 243569 वर पोहोचली आहे. बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्क्यांवर पोहोचले आहे.









