वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंड क्रिकेट संघातील खेळाडू हेन्री निकोल्स तसेच ब्लेअर टिकनर आणि गोलंदाज प्रशिक्षक शेन जुर्गेनसन यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त क्रिकेट न्यूझीलंडने दिले आहे. न्यूझीलंड संघाचा आगामी सरावाचा सामना ससेक्स संघाबरोबर खेळविला जाणार आहे.
न्यूझीलंडचा संघ इंग्लंडच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात उभय संघामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका आयोजित केली आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 2 जून रोजी लॉर्डस् मैदानावर होणार आहे. इंग्लंडच्या दौऱयापूर्वी न्यूझीलंड संघातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये दोन खेळाडू आणि गोलंदाज प्रशिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. कोरोना बाधित व्यक्तींना सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. निकोल्स, टिकनर आणि प्रशिक्षक जुर्गेनसन यांना हॉटेलमध्येच पाच दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान या दौऱयात न्यूझीलंडचा चार दिवसांचा सरावाचा सामना कदाचीत लांबणीवर टाकला जाईल. हा सामना 26 मे पासून खेळविला जाईल.








