बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान १ मार्च ते १४ ऑगस्ट या कालावधीत १५ वर्षांखालील एकूण ७,३२० मुलांना झाली आहे. ज्यात पाच वर्षांखालील १,८२४ मुलांचा समावेश आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार, याच काळात १६ ते २० वयोगटातील ५,१५५ मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे.
२१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी२०२१ पर्यंत पहिल्या लाटेदरम्यान, १५ वर्षांखालील एकूण २,१२२ मुले कोविड संक्रमित झाली होती, तर १६ ते २० वयोगटातील एकूण २,१२७ मुले पहिल्या लाटेत संक्रमित झाली होती.
दुसऱ्या लाटेदरम्यान २० वर्षांखालील कोणीही संसर्गाला बळी पडले नाही. पहिल्या लाटेत, ५ वर्षांखालील ३ मुलांसह ५ मुलांनी कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमावला होता.
२१ ते ३० वयोगटातील १४,००३ लोकांना दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर ४१ ते ५० वयोगटातील १०,८७९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच ९१ वर्षांवरील ११४ लोक, ८१ ते ९० वर्षे वयोगटातील ९६३ लोक आणि ७१ ते ८० वर्षे वयोगटातील ३,२२७ व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.