वार्ताहर, बागणी
Sangli News : येथील माळव्यासाठी प्रसिद्ध असणारे युवा शेतकरी शंकर गायकवाड यांनी त्यांच्या २० गुंठे क्षेत्रावर केलेल्या कोथिंबिरीला दर नसल्याने रोटर घातला. शंकर हे गेली १० ते १२ वर्ष झाली माळवे क्षेत्रात आहेत.त्यांनी यापूर्वी कांदा, कोथिंबीर, मेथी, वांगी, मिरची, टोमॅटो यामध्ये मोठ्या प्रमानात उत्पादन घेतले होते. पण सध्या कोथिंबिरीला पेंडीस २ रू. दर असल्याने घातलेला खर्च,औषधे,मशागत याचा खर्च जास्त झाला असल्याने परवडत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला व शेतात सरळ रोटर घातला.एका बाजूला टोमॅटो ने गाठलेला दर आणि कोथिंबीरीचा पडलेला दर यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.








