कोल्हापूर :
जिल्हा परिषदेमध्ये जिल्हास्तरीय खातेप्रमुख आणि जिह्यातील सर्व गटविकास अधिकारी आणि तालुका स्तरीय खातेप्रमुख यांची समन्वय सभा मंगळवारी पार पडली. या सभेला जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस यांनी सकाळी दहा वाजल्यापासून उपस्थित राहून आढावा घेतला व मार्गदर्शन केले. दिवसभरात विकासात्मक, प्रशासन आणि तालुका स्तरीय यंत्रणेची विविध योजनांच्या अंमलबावणीमध्ये असणारी भूमिका आणि करावयाची कर्तव्ये याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत जवळपास 10 तास ही बैठक सुरू होती.
स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेताना वैयक्तिक स्वच्छतागृहाचे उद्दिष्ट 100 टक्के साध्य होईल याकडे गट विकास अधिक्रायांनी वैयक्तिक लक्ष द्यावे. तसेच घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रियेच्या सर्व मंजूर कामांचा अहवाल 27 डिसेंबर पर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या. पशू संवर्धन विभागाकडील पशू गणनेचे काम जिह्यातील सर्व गावांमध्ये डिसेंबरअखेर सुरू झाले पाहिजे अशा सूचना सर्व गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रामधून दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याबाबत वैद्यकीय अधिक्रायांनी सतर्क राहावे अशा सूचना देऊन संस्थात्मक प्रसूतीबाबत सीईओनी नाराजी व्यक्त केली. घरकुल योजनेच्या सर्व निकषांवर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे आणि यामध्ये लाभार्थी व ग्रामपंचायत यंत्रणा यांना सहभागी करण्याच्या सूचना दिल्या. घरकुल पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जल जीवन मिशन मध्ये ज्या गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत पण अद्याप सुरू झाल्या नाहीत, त्या गावाच्या पदाधिक्रायांना गटविकास अधिक्रायांनी समक्ष चर्चेला बोलावून कामे सुरू होतील याकडे लक्ष द्यावे.अन्यथा या गावाच्या योजनेबाबत गंभीरपूर्वक निर्णय घेतला जाईल असा इशाराही सीईओनी दिला. जिह्यातील ज्या कर्मच्रायांची खाते निहाय चौकशी प्रस्तावित केलेली आहे, अथवा ज्यांची खाते निहाय चौकशीची प्रक्रिया सुरू आहे,अशी सर्व प्रकरणे गटविकास अधिक्रायांनी स्वत? आढावा घेऊन निकाली निघतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच विभागीय आयुक्तांनी त्यांच्या अहवाल वाचनात दिलेल्या सूचनेनुसार गैरवर्तन करण्राया कर्मच्रायाबाबत कोणतीही सहानुभूती न बाळगता त्याच्यावर कारवाईबाबत तात्काळ प्रकिया करण्यात यावी असे त्यांनी सूचित केले.
तालुका स्तरीय तक्रारींचा तेथेच निपटारा करा
ग्रामपंचायत विभागाकडील आढाव्यादरम्यान पंधरावा वित्त आयोगाचा खर्च आराखड्यानुसार पूर्ण करण्याच्या सूचना सीईओनी दिल्या. तसेच तालुकास्तरीय तक्रारींचा त्याच स्तरावर गटविकास अधिकारी यांनी निपटारा केल्यास जिल्हास्तरावर या तक्रारी येणार नाहीत. याबाबत गटविकास अधिक्रायांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
गटविकास अधिकाऱ्यांचे गुणांकन
जिह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांचे गुणांकन केले आहे. त्यांच्याकडील एकूण कामकाजाच्या मुद्यावर 140 गुणांचे गुणांकन करण्यात आले आहेत. त्यानुसार राधानगरी तालुका 86.56 गुनासह प्रथम क्रमांकावर असून कागल तालुका 86.45 गुणांसह दुस्रया क्रमांकावर आहे . सर्वात कमी गुण करवीर तालुक्याला 76.52 आहेत. जिह्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने गुणांकन केले असून यानुसार गट विकास अधिकारी यांच्या कामगिरीचे वार्षिक मूल्यांकन केले जाणार आहे.
गटविकास अधिकारीयांचे गुणांकन
राधानगरी – 86.56, कागल – 86.45, भुदरगड – 86.26, गगनबावडा – 83.78 , शिरोळ – 83.27, हातकणंगले – 81.58,शाहूवाडी – 80.96, आजरा – 79, करवीर – 76.52, चंदगड – 76.66,पन्हाळा – 77.68,गडहिंग्लज – 77.94.








