कोल्हापूर :
पुणे रेल्वे प्रशासन प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. रेल्वेच्या विकासासाठी, प्रवासी सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी अर्थपूर्ण प्रयत्न आणि सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार यांनी केले.
विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीची बैठक पुणे येथे झाली. यावेळी ते बोलत होते. वर्मा यांनी पुणे विभागातील प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधांची कामे आणि विकासकामांसाठी सुरू असलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती दिली. रेल्वेचे सुरक्षित आणि वेळेवर ऑपरेशन, रेल्वे रुळांची योग्य देखभाल, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे इत्यादींसाठी योग्य पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत उपस्थित सदस्यांनी प्रवाशांच्या सुविधा आणि समस्यांबाबत सूचना दिल्या आणि रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली. या बैठकीला कोल्हापुरातून शिवनाथ बियाणी, नंदकुमार बाबुराव पाटील, राहुल रमण मुथा, अधिवक्ता विनीत विलास पाटील, ऋतुराज अर्जुनराव काळे, राम बी. उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित सदस्यांनी पुणे ते साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी ते पंढरपूर, मनमाड ते पुणे अशी नवीन गाडी सुरू करणे, बेलापूर स्थानकावर हॉलिडे स्पेशलचा थांबा, सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करा, राहुरी येथे नवीन गाडी सुरू करणे असे विविध मुद्दे उपस्थित केले. कोल्हापूर/बेळगाव ते पुणे इंटरसिटी एक्सप्रेसचीही मागणी करण्यात आली.
शिवनाथ बियाणी यांची निवड
पुणे विभागीय सल्लागार समितीचे शिवनाथ बियाणी यांची झेडआरयूसीसीचे सदस्य म्हणून एकमताने निवड करण्यात आली. बियाणी यांनी कोल्हापूर रेल्वे प्रवाशीसाठी वेळवेळी आवज उठविला आहे.








