मुंबई
यात्रा ऑनलाईन कंपनीच्या आयपीओला दुसऱ्या दिवशी थंडा प्रतिसाद लाभला आहे. 775 कोटी रुपयांचा हा आयपीओ दुसऱ्या दिवशी 22 टक्के इतका सबस्क्राईब झाला होता. यात्रा ऑनलाईनचा समभाग 135-142 रुपये प्रति समभाग याप्रमाणे विकला जात आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी हा आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब केला आहे. 602 कोटी रुपयांचे ताजे समभाग कंपनीने विक्रीकरीता उपलब्ध केले आहेत.