प्रतिनिधी,कोल्हापूर
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यास पहिल्या दिवशी राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमध्ये ग्राहकांचा थंडा प्रतिसाद दिसून आले. मंगळवार 23 रोजीपासून बँकांनी दोन हजारांच्या नोटांचा भरणा करुन घेण्यास सुरवात केली. मात्र पहिल्या दिवशीच नोटांचा भरणा करण्यास अल्पप्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमधून दोन हजाराची नोट बदलून घेण्यास किंवा बँक खात्यामध्ये जमा करण्यास सांगितले. नोटा बदलण्याच्या प्रक्रीयेस मंगळवार पासून प्रारंभ झाला. 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलण्याची प्रक्रीया सुरु राहणार असल्याने बँकांमध्ये गर्दी करु नका असे आवाहन आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमध्ये पहिल्या दिवशी दोन हजाराची नोट बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी तुरळक प्रमाणात ग्राहक येत होते. या अल्पप्रतिसादामुळे नोटा जमा करण्यासाठी बँकांना स्वतंत्र अशी यंत्रणा उभी करावी लागली नाही.
Previous Articleओपा पातळीत घट, ‘पाणीबाणी’ शक्य
Next Article देशातील जैवविविधता नोंदणींचे डिजिटायझेशन









