वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
झिंबाब्वेमध्ये होणाऱ्या टी-20 च्या तिरंगी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात दुखापतग्रस्त फिन अॅलेनच्या जागी यष्टीरक्षक आणि फलंदाज देवॉन कॉन्वेचा बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. सदर माहिती क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने दिली आहे.
या मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या न्यूझीलंड संघामध्ये मिचेल हे, जिमी निश्चाम, टी रॉबिनसन यांचा समावेश आहे. तसेच मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स आणि रचिन रविंद्र हे सोमवारी होणाऱ्या एमएलसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार असल्याने त्यांच्या जागी मिचेल हे, निश्चाम आणि रॉबिनसन यांना बदली खेळाडू म्हणून संधी दिली जाईल. या तिरंगी मालिकेत यजमान झिंबाब्वेचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार असून न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना येत्या बुधवारी खेळवला जाईल.









