प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये पहिल्या अग्निवीर तुकडीचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. 31 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 111 अग्निवीरांनी पासिंग आऊट परेड केले. या परेडचे परीक्षण मेजर जनरल आर. एस. गुरया (व्हीएसएम, कमांडर, ज्युनियर लिडर्स विंग) यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात अग्निवीरांचे कौतुक केले. तसेच मराठा इन्फंट्रीच्या गौरवशाली परंपरेची माहिती दिली.
प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरीची नोंद केलेल्या अग्निवीरांना सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट अग्निवीरचे ‘नाईक यशवंत घाडगे व्हिक्टोरिया क्रॉस पदक’ अक्षय ढेरे यांना प्रदान करण्यात आले. शरकत वॉर मेमोरियल येथे रेजिमेंटच्या शूरवीरांना समीक्षा अधिकारी आणि अग्निवीरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून परेडचा समारोप करण्यात आला.









