न्हावेली / वार्ताहर
व्यापारी संघटनाच्या माध्यामातून सामाजिक कार्य
मळेवाड जकात नाका येथील व्यापारी संघटना मार्फत वाढत्या वाहतुकिच्या पार्श्वभूमीवर मळेवाड जकात नाका येथे अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे, मळेवाड जकात नाका येथील व्यापारी संघटने मार्फत मळेवाड जकात नाका येथे सातार्डाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला खास येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा अपघात टाळण्यासाठी बहिर्गोल आरसा (ट्रॅफिक कॉन्वेक्स मिरर) बसविण्यात आला आहे.या मिरर मुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गावडे व उपाध्यक्ष रमाकांत नाईक यांनी सांगितले.व्यापाऱ्यांच्या सहकार्याने बसविलेल्या या मिरर मुळे वाहनधारकाकडून समाधन व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी व्यापारी संघटना अध्यक्ष श्री.पांडुरंग गावडे,उपाध्यक्ष रमाकांत नाईक यांनी फित कापून या सेवेचा शुभारंभ केला.यावेळी येथील व्यापारी बंधू उपस्थित होते.









