मंत्री विश्वजित राणे यांच्यावर गिरीश चोडणकरांचा आरोप : राणेंकडून 50 हजार कोटी कमविण्याचा प्रयत्नाचा दावा,आराखड्यातील तीन दुऊस्त्या मागे घेण्याचीही मागणी
पणजी : नगर व नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी गेल्या सहा महिन्यांत दोन लाख चौरस मीटर जमिनीचे ऊपांतर केले असून, टीसीपी कलम 17 (डी), 17 (2) आणि फार्महाऊस धोरण वापरून 50 हजार कोटी ऊपये कमावण्याचा प्रयत्न मंत्री राणे यांनी चालविला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या पणजी येथील कार्यालयात काल रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, नगर व नियोजनमंत्री राणे यांच्यावर आरोप केले. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप नाईक, मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, मांद्रे गटाचे अध्यक्ष नारायण रेडकर उपस्थित होते.
तीन दुरुस्त्या तात्काळ मागे घ्या
17 (डी) (झोन बदलणे), 17 (2) (प्रादेशिक आराखड्यातील त्रुटी सुधाऊन ऊपांतरण करणे) आणि गोवा रेग्युलेशन ऑफ लँड डेव्हलपमेंट अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कायद्याचा वापर करून प्रादेशिक आराखड्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न विद्यमान भाजप सरकार करत आहे. गोव्याला लँड शार्कपासून वाचवण्यासाठी या तीन दुऊस्त्या तात्काळ मागे घ्याव्यात, अशी आमची आग्रही मागणी आहे.
आराखडा संकल्पना उद्ध्वस्त
सरकारवर आरोप करताना चोडणकर यांनी सांगितले की, भाजपने प्रादेशिक आराखड्याची संकल्पनाच उद्ध्वस्त केली आहे. याआधी काँग्रेसच्या काळात गोवा बचाव अभियानाने आमच्या जमिनी वाचवण्यासाठी आंदोलने केली. कारण आमचे आमच्या भूमीवर प्रेम आहे. मात्र, विश्वजित राणे यांच्याकडे जमीन रूपांतरणाचे कौशल्य आहे आणि गोवा संपवण्यासाठी ते लोकांच्या विरोधात काम करत आहेत, असे ते म्हणाले. चोडणकर यांनी कागदपत्रांच्या दस्ताऐवजासह पुरावे सादर करताना सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून कलम 17 (2) वापरून 2 लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतर करण्यात आले आहे. हे ‘सूटकेस ते सूटकेस’ आधारावर केले जाते. विश्वजीत राणे तीन सुधारित कलमांचा वापर करून जमीन लुटत आहेत. मात्र गोव्यातील जनतेने सतर्क राहावे. पेडणे येथील लोकांनी झोनिंग आराखडा रद्द करण्यासाठी आंदोलन केले, तसे इतरांनाही करावे लागेल, असे ते म्हणाले.
टीसीपी बैठकीचे इतिवृत्तही सादर
सत्तरी तालुका, डिचोली तालुका, रेस मागूस, उसगाव, कदंब पठार, आसगाव, नेरूल, मयडे, कामुरली, कोलवाळे, अंजुना, शिवोली आणि कोलवाळे येथील क्षेत्रीय आराखडा तयार करण्याचा निर्णय घेणाऱ्या नगरनियोजन खात्याच्या मंडळच्या बैठकीचे इतिवृत्तही सादर करत चोडणकर यांनी ते वाचून दाखवले. या बैठकीत ज्या पद्धतीने काम केले जाणार आहे, त्याची माहिती चोडणकर यांनी पुराव्यासह सादर केली.
फार्म हाऊसच्या नावाखाली…
सुधारणांचा वापर करून कोट्यावधी ऊपये खर्चून सर्व सुविधांसह फार्महाऊस बांधले जात आहेत. गोमंतकीय शेतकऱ्यांची फार्महाऊसवर करोडो ऊपये खर्च करण्याची क्षमता आहे का? असा प्रश्न विचारत गिरीश चोडणकर यांनी शेती करण्यासाठी मोठ्या फार्महाऊसची गरज नसताना ही जमीन रूपांतरित कऊन पैसे लुटण्याची युक्ती मंत्री विश्वजित राणे यांनी चालवली असल्याचे सांगितले. तसेच अनेक फार्महाऊसच्या पुराव्यांचा मंजूर आराखडा त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवला.









