सुविधांचा वापर करण्याकडे शहरवासियांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामांसह स्मार्ट सुविधादेखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कर भरणा, व्यवसाय परवाना, शहरातील बसचे वेळापत्रक तसेच अन्य सुविधा ‘माय बेळगावी’ या ऍपवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र या सुविधांचा वापर करण्याकडे शहरवासियांचे दुर्लक्ष झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरवासियांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नागरी सुविधांसह घरबसल्या काम करण्यासाठी स्मार्ट सुविधादेखील उपलब्ध करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली होती. यापैकी काही योजना अमलात आणल्या आहेत. तर काही योजनांकडे स्मार्ट सिटीचे दुर्लक्ष झाले आहे. केवळ शहरातील रस्त्यांचा विकास करण्यात आल्याची माहिती शहरवासियांना आहे. अन्य स्मार्ट सुविधांची माहिती शहरवासियांपर्यंत पोहोचली नसल्याने याचा वापर होत नसल्याचे स्मार्ट सिटी कंपनीच्या निदर्शनास आले आहे. स्मार्ट सीटीमध्ये स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र बसथांब्यांची देखभाल व्यवस्थित केली जात नाही. त्यामुळे सदर बसथांबे भटक्मया जनावरांचे आश्रयस्थान बनले आहेत. स्मार्ट बसथांब्याबरोबर बस प्रवाशांच्या सुविधेसाठी बस वेळापत्रक आणि बस कोणत्या ठिकाणी आहे? याची माहिती मिळण्याची सुविधा मोबाईल ऍपवर उपलब्ध करण्यात आली आहे. स्मार्ट फोन वापरणाऱया प्रत्येक मोबाईलधारकाला ही माहिती उपलब्ध होऊ शकते.
पण या ऍपची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे या सुविधेचा वापर होत नाही. तसेच मालमत्ता कर, व्यवसाय परवाना तसेच महापालिकेकडून उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी महापालिका कार्यालयात जावे लागते. वास्तविक पाहता या सुविधादेखील मोबाईलवरील ऍपवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या ‘माय बेळगावी’ या ऍपवर विविध विभाग करण्यात आले असून, त्या अंतर्गत शहरवासियांना घरबसल्या माहिती घेता येवू शकते.
डिस्कव्हर
- शहराची माहिती
- सरकारी कार्यालयांचे संपर्क क्रमांक
- घडामोडींची माहिती
- महत्त्वाच्या बातम्या
गव्हर्मेंट सर्व्हिसेस
- बेळगाव वन
- जनहित तक्रार निवारण केंद्र
- इमारत बांधकाम परवाना
- व्यवसाय परवाना
- जन्म-मृत्यू दाखला
- कर भरणा
- मालमत्तेची माहिती
स्मार्ट सोलुशन्स
- स्वच्छता
- बसचे वेळापत्रक
- वायफायची माहिती
- माय ग्रेव्हियन्स- तक्रारींची नेंद करण्यासाठी
- वेदर- हवामानाची माहिती मिळतs
- घोषणा – सरकारकडून केलेल्या घोषणांची माहिती
- फिड बॅक – आपली मते नोंदविण्यासाठी
नियर मी
पुरातत्त्व खात्याने जतन केलेल्या स्थळांची माहिती
- एटीएम
- एअरपोर्ट
- बँक, बसस्टॉप
- क्लब
- कम्युनिटी सेंटर
- स्मशानभूमी
- डे केअर सेंटर
- निवडणूक मतदान केंद्र
- विद्युत पुरवठा उपकेंद्र
- मनोरंजन केंद
- गॅस एजन्सी
- अग्निशमन केंद
- सरकारी कार्यालय
- हेरिटेज पार्क
- हॉटेल्स
- मार्केट
- वैद्यकीय केंद्र
- मेडिकल स्टोअर्स
- पार्किंग
- उद्याने
- पॅथॉलॉजिक लॅब
- पेट्रोल पंप
- पोलीस स्टेशन
- पोस्ट ऑफिस
- रेल्वे स्टेशन्स
- धार्मिक स्थळ
- रेस्टॉरंट
- शॉपिंग कॉम्प्लेक्स
- क्रीडा संकुल
- बीएसएनएल एक्स्चेंज ऑफिस









