प्रेमाची कबुली देण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. काही माणसं या कबुलीसाठी मोठी तयारी करत असतात. हा क्षण खास ठरावा आणि समोरच्या व्यक्तीला सरप्राइज मिळावे असा प्रयत्न असतो. परंतु एका घटनेत प्रपोजलच उलटे पडले आणि जे घडले ते व्हायरल झाले.
चीनमध्ये एक इसम स्वत:च्या मैत्रिणीला सरप्राइज देऊ इच्छित होता, या इसमाचे लियू नावाच्या महिलेवर प्रेम होते. परंतु तो स्वत:चे प्रेम व्यक्त करू शकत नव्हता. मग त्याने कशाप्रकारे तरी हिंमत जमवत एका रेस्टॉरंटच्या मदतीने सरप्राइज प्लॅन तयार केला, त्याने कपकेकच्या आत रिंग लपविली, परंतु हा कपकेक प्रेयसीच्या समोर येताच तिने तो पूर्ण खाऊन टाकला.
खराब गुणवत्तेमुळे केकमध्ये काहीतरी आले असावे असे लियूला वाटले. परंतु अधिक जवळून पाहिले असता तिला ती प्रपोजल रिंग असल्याचे आढळून आले, बेकरीकडे याविषयी तक्रार करण्याचा विचार तिने केला होता.
प्रपोजल अॅक्सेप्ट
केकवर क्रीमचा मोठा थर होता, तो खाताच आणि चावताच अचानक त्यात काहीतरी कठोर असल्याचे जाणवले. यामुळे मी ते त्वरित थुंकून टाकले, हा केकच्या खराब गुणवत्तमुळे प्रकार घडल्याचे मला प्रारंभी वाटले, परंतु नंतर प्रपोजलसाठी ही रिंग लपविली असल्याचे कळले असे लियूचे सांगणे आहे.
कधीच खाद्यपदार्थांमध्ये लपवू नका रिंग
केकसोबत काही तरी ठोस असल्याचे कळताच मी ते थुंकून टाकले होते, यानंतर समोर रिंग होती. याचवेळी समोरील इसमाने केकमधील रिंग उचलली आणि ही प्रपोज करण्यासाठी आणल्याचे सांगितले अशी माहिती लियूने दिली आहे. ही घटना चीनच्या सिचुआन प्रांताच्या गुआंगआन येथील असून ती लियू नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात सर्व पुरुषांनी लक्ष द्यावे, कधीही खाण्याच्या गोष्टीत प्रपोजलची रिंग लपवू नका’ असे नमूद आहे.









