मच्छिमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे प्रतिपादन
पेडणे : भूषण नाईक यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. यामुळे ते सर्वांच्या मनात घर कऊन आहेत. त्यांनी समाजात आणि समाजाच्या हितासाठी असेच कार्य करून समाजाबद्दल असलेला आदर आणि प्रेम आपल्या कार्यातून व्यक्त करावा आणि समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी, असे उद्गार मच्छिमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी वजरी येथे काढले. भूषण नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वजरी येथील हिरा फार्म येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने मंत्री हळर्णकर बोलत होते. व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशिदास गवस, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, समाजसेवाक महेश परब, नीलिमा भूषण नाईक उपस्थित होत्या. भूषण नाईक हे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व असून विविध क्षेत्रात त्यांचा वावर आहे. अडलेल्या नडलेल्या गरजू लोकांना ते मदतीचा हात देत सदैव कार्यरत असतात हेच त्यांचे वैशिष्ट्या आहे. राजकारण, समाजकारण करत असताना त्यांनी वेगळी छाप पाडली आहे. त्यांनी समाजाप्रती असेच कार्य करत रहावे, असे सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. भूषण नाईक यांना गरजू जनते प्रति आदर आहे. त्यांच्या या कृतीचा अनेकांनी बोध घेवून जनसेवा करावी. सामान्य कुटुंबात जन्मलेले भूषण नाईक हे संघर्षमय जीवन जगून सरपंचपदापर्यंत पोहोचले तरी त्यांनी कधी मोठेपणा बाळगला नाही, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो म्हणाले. आपल्या विजयात भूषण नाईक यांचे खूप मोठे सहकार्य असून याची आपल्याला जाणीव आहे. भूषण नाईक यांनी पेडणेच्या विकासासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानाची आपल्याला जाण असून येणाऱ्या पुढील निवडणुकीत ते सरपंच पदावर आरूढ होतील, असा विश्वास आमदार प्रवीण आर्लेकर यांनी व्यक्त केला. तुळशिदास गावस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कृष्णा पालयेकर यांनी सूत्रसंचालन केले. महेश परब यांनी आभार मानले.









