तालुक्यातील आठ तलावासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर, कंत्राटदाराअभावी कामाची सुरवात नाही
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्मयात अमृत सरोवरसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र या कामाची सुऊवात झाली नसल्याने या तलावांचे सुशोभीकरण झालेले नाही. तालुक्मयात एकूण आठ तलावांची अमृत सरोवरासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये कक्केरी, हलशी, कामशिनकोप, पारिश्वाड, लिंगनमठ, माणिकवाडी, तोपिनकट्टी, कणकुंबी या ठिकाणी अमृत सरोवर योजना मंजूर झालेली आहे. मात्र कंत्राटदार निविदा भरत नसल्याने या कामाची अद्याप सुरुवात झालेली नाही, अशी माहिती जिल्हा पंचायतीचे अभियंते बन्नूर यांनी दिली. तालुक्यातील आठ तलावांची अमृत सरोवर योजनेखाली निवड करण्यात आली आहे. यात तलावातील गाळ काढून खोली वाढवण्यात येणार आहे. तसेच तलावाचे सुशोभिकरण करून या ठिकाणी पर्यटनाच्या धर्तीवर विकास करण्याची योजना आहे. तालुक्यातील कक्केरी तलावासाठी 43 लाख, पारिश्वाड तलावासाठी 50 लाख, कामशिनकोप तलावासाठी 49 लाख 90 हजार, हलशीसाठी 49 लाख 15 हजार, लिंगनमठसाठी 46 लाख, माणिकवाडीसाठी 11 लाख, तोपिनकट्टीसाठी 49 लाख 70 हजार तर कणकुंबीसाठी 49 लाख 90 हजारचा निधी मंजूर झाला आहे. मात्र हे काम महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत करण्यात येणार असल्याने यासाठी निविदा काढून देखील कोणीही निविदा भरलेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून अमृत सरोवराचे काम सुरुच झालेले नाही.
स्थानिक कंत्राटदारांना निविदा भरण्यासाठी आवाहन
एकूण तालुक्मयातील आठ तलावासाठी सध्या निधी मंजूर झाला आहे. कोणीही कंत्राटदार निविदा भरत नसल्याने या कामाची सुऊवातच अद्याप झालेली नाही त्यामुळे कोट्यावधीचा निधी वाया जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. जिल्हा पंचायत अंतर्गत या योजनेतील पूर्तता करण्यात येणार आहे. जिल्हा पंचायतीच्या अभियंत्यांनी स्थानिक पातळीवरही या कंत्राटदारांना निविदा भरण्याचे आवाहन देखील केले होते. मात्र कोणीही कंत्राटदार हे काम करण्यास पुढे येत नसल्याने सरकारची ही अमृत सरोवर योजना वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्यात या अमृत सरोवर योजनेमुळे तलावांचे सुशोभिकरण तसेच विस्तारीकरण झाल्याने ग्रामीण भागात पर्यटनास चालना मिळणार आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकही या ठिकाणी फिरावयास येऊन याचा आनंद घेणार आहेत. मात्र योजनेची सुरवातच झाली नसल्याने याबाबत सांशकता व्यक्त करण्यात येत आहे.









