इचलकरंजी : राज्य सरकारने नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा घेतलेला निर्णयदुर्दैवी आणि सुशिक्षित बेकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. याचुकीच्या धोरणामुळे प्रचलित सरळसेवा परीक्षेद्वारे अधिकारी होऊन देशाचीसेवा करण्याचे तरुणांनी उराशी बाळगलेल्या स्वप्नाशी राज्य सरकारला खेळखेळायचा आहे का? असा सवाल स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहेकी ,राज्य सरकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कार्यरत
आहे. पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी एक कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करूनदेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे पुढे काय झाले हे अद्यापहीतरुणांना समजलेले नाही. तोवरच आपल्या नेतृत्वाखालील सरकारनेमहाराष्ट्रामध्ये सरकारी भरतीसाठी कंत्राटी धोरण अवलंबून तरुणांच्याउरल्यासुरल्या आशाही धुळीला मिळणार आहेत. चुकीचा पायंडा पाडण्याच्यानिर्णयाने तरुणांमध्ये नैराश्य वाढत जाण्याचा मोठा धोका आहे. यातूनआपल्याला युवकांच्या होण्राया आत्महत्या पाहावयाच्या आहेत की काय ? असाखडा सवालही या पत्रातून सौरभ शेट्टींनी उपस्थित केला आहे.
पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरतीच्या पेपर फुटीनंतर किंवाटीसीएस आणि वेगवेगळ्या कंपन्यांना पेपर घेण्याचे कंत्राट देऊनही अनेकगैरप्रकार समोर आलेले आहेत. त्याचा खूप गाजावाजाही झाला.राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे. महागाईमुळेसर्वसामान्यांचे जीवन असह्य झाले आहे. यात भरीस भर म्हणजे कंत्राटी नोकरभरती निर्णयाचा स्वाभिमानी विद्यार्थी परिषद निषेध करत आहे. राजकीय नेताअथवा प्रस्थापितांची मुले नाहीत, तर सर्वसामान्य घरातील मुले आहेत आणियांची सर्वसामान्यांची मुले सरळसेवा परीक्षांचा जीवतोड अभ्यास करीत आहेत.याला कुठेतरी राज्य सरकारकडून छेद देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातूनविद्यार्थ्यांचा वाढता रोष सरकारला परवडणारा नाही. तरुणांचे भविष्यअंधारात ढकलणऱ्या अशा धोरणाविरुद्ध बंड पुकारून राजू शेट्टी यांच्या
नेतृत्वाखाली स्वाभिमानी विद्यार्थी परिषद रस्त्यावरची लढाई हाती घेईल, असा इशारा सौरभ शेट्टी यांनी पत्राच्या शेवटी दिला आहे.
आज रस्ता रोको आंदोलन
सरकारी नोकर भरती ही स्पर्धा परीक्षा ऐवजी कंत्राटी पद्धतीने करण्याचा जोराज्य सरकारने निर्णय घेतला त्यातून खाजगी कंपनीची मत्तेदारी वाढेल आणियाचा निषेधार्थ सोमवारी सकाळी 9 वाजता इचलकरंजी फाटा, धर्मनगर इथेस्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून शेकडो तरुणांसह रस्ता रोको करून निषेध व्यक्त करायचा असल्याचे सौरभ शेट्टी यांनी सांगितले.









