खारेपाटण/ वार्ताहर-
मान्सून च्या दमदार अगमना नंतर कोकणात कोसळनार्या जोरदार पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत.खारेपाटण येथे गेले दोन दिवस धुवाधार कोसळणार्या पावसामुळे येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडून पुर सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. सतत कोसळणारया पावसामुळे पुराचे पाणी रस्त्यांवर येऊन घोडेपाथर बंदर येथील वहातूक बंद झाली आहे. त्यामूळे बन्दरवाडी, सम्यकनगर, वायण्गणी येथील ग्रामस्थाना डोंगरातील अडचणीच्या पायवाटेचा अधार घ्यावा लगत आहे. दरवर्षी उद्भवनार्या या समस्ये मुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आसुन लोक्प्रतिनिधिनी या ठिकाणी आश्वसनापलिकडे कहीच उपाययोजना केली नसल्याने ग्रमस्थमध्ये नाराजी असल्याचे दिसुन येत आहे.









