अमेरिकेतील अत्यंत अनोखी स्पर्धा
हॉट डॉग तसेही अमेरिकेतील पसंतीचे फास्ट फूड आहे, परंतु आता हे भारतातही सहजपणे उपलब्ध होते. अमेरिकेत तर लोक अत्यंत आवडीने हॉट डॉग खात असतात. तेथे या फास्ट फूडशी निगडित एक स्पर्धा देखील आयोजित होते, ज्यात सर्वाधिक हॉट डॉग खाणाऱ्याचा विजय होतो. दर वर्षी 4 जुलैच्या दिवशी अमेरिकेच्या एका शहरात ही मजेशीर स्पर्धा आयोजित होत असते.
4 जुलै हा अमेरिकेतील स्वातंत्र्य दिन आहे. यादिवशी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिनमध्ये कोनी आयलँड येथे हॉट डॉग ईटिंग कॉन्टेस्टचे आयोजन केले जाते. तेथेच या स्पर्धेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नॅथन्स हॉट डॉग ईटिंग कॉन्टेस्ट देखील म्हटले जाते.

या खास स्पर्धेचा नियम केवळ एकच आहे. 10 मिनिटात सर्वाधि हॉट डॉग फस्त करणारा या स्पर्धेत विजयी ठरतो. या स्पर्धेला ऑलिम्पिक्स ऑफ कॉम्पिटेटिव्ह ईटिंग या नावाने देखील ओळखले जाते. पूर्ण अमेरिकेतून सुमारे 35 हजार स्पर्धक यात सामील होत असतात. अशाप्रकारची पहिली स्पर्धा 4 जुलै 1916 रोजी आयोजित करण्यात आली होती असे अनेक लोकांचे मानणे आहे. त्याचदिवशी नॅथन्स हॉट डॉगचा आविष्कार झाला होता. 4 युरोपीय स्थलांतरित त्या दिवशी आपल्यापैकी अधिक अमेरिकन कोण यावर भांडत होते. याचा निर्णय हॉट डॉग खाण्याच्या स्पर्धेमधून घेतला जावा असा निर्णय त्यांनी घेतला होता. आयर्लंडमधून अमेरिकेत दाखल झालेले जिम मुलेन हे त्यावेळी विजयी झाले होते. जिम यांनी एकूण 13 हॉट डॉग खाल्ले होते. तेव्हापासूनच या अनोख्या स्पर्धेला सुरुवात झाली होती. तर नॅथन्सची वेबसाइट आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनुसार या स्पर्धेची सुरुवात 1972 मध्ये झाली होती.
2011 मध्ये या स्पर्धेत महिलांसाठी स्वतंत्र श्रेणी सुरू करण्यात आली होती. केंटकी येथे राहणारे जोई ‘जॉज’ चेस्टनट यांनी या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 15 वेळा विजय मिळविला आहे. त्यांचा विक्रम 76 हॉट डॉग खाण्याचा आहे. महिलांमध्ये लास वेगासची मिकी सूडो ही दीर्घकाळापर्यंत विजेती राहिली आहे. तिच्या नावावर 48 हॉट डॉग फस्त करण्याचा विक्रम आहे. यंदाही याच दोघांनी बाजी मारली आहे. महिलेने 39 हॉट डॉग खाऊन पहिले स्थान मिळविले. तर चेस्टनटने 62 हॉटडॉग खात स्पर्धेत 16 व्यांदा विजय मिळविला आहे.









