2009 साली आमदार झाल्यावर मी लोकसभा लढवावी अशी पक्षाची इच्छा होती. तसेच उत्तर मतदारसंघात गैरसमजामुळे पराभव झाला असून उत्तर मतदारसंघाबरोबरच दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी नागरिकांची इच्छा असल्याचे मत माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी सतेज पाटील य़ांच्यावर टिका करताना पालकमंत्र्यांवर टिका करण्यापुर्वी स्वत: आत्मपरिक्षण करण्यास सांगितले आहे. दक्षिण मतदारसंघात पैशाच राजकारण चाललं असून कुणीही उठतोय आणि निवडणूकीला उभा राहतोय. असे म्हणून त्यांनी दक्षिणमधूनही इच्छूक असल्याचे संकेत दिले आहेत.
कोल्हापूरात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना राजेश क्षीरसागर म्हणाले, “2009 साली कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाचं मत होत कि मी लोकसभा लढवावी. कारण जिल्ह्यात माझा मोठा फॅन फॉलोअर आहे. संपूर्ण दहा वर्षांत चळवळीच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याच काम केल आहे. आमदार झाल्यानंतर टोलसह विविध चळवळीत मी सहभागी झालो. ज्यांना कोणीही नाही, त्यांच्यासाठी मी सातत्याने काम करत आलो आहे. गणेश मंडळासाठी तर पोलीस अधिकाऱ्यांना अंगावर घेतलं. या सर्व गोष्टींची माहिती जनतेला आहे. उत्तर मतदारसंघात झालेल्या गैरसमजामुळे माझा पराभव झाला. तरीही हजारो कोटींचा निधी मी खेचून आणला आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी केलेल्या कामांमुळे उत्तर मतदारसंघातून मला निवडणून देण्याची जनतेची इच्छा आहे. तसेत दक्षिण विधानसभा मतदारसंघ मला लागूनच आहे. उत्तर मतदारसंघातील कुटुंबं मोठी झाल्याने अनेक कुटुंब दक्षिण मतदारसंघात गेली आहेत. त्या लोकांची इच्छा आहे कि मी दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवावी. कारण दक्षिण मतदारसंघात पैशाच राजकारण चाललं आहे. कुणीही येतोय आणि निवडणूकीला उभा राहून पाच- पाच हजाराने मतं विकत घेतोय. पण निवडणुकीनंतर जनतेला कोणीही विचारात घेतले जात नाही. त्यामुळे दक्षिण मतदारसंघातील जनता याला कंटाळली आहे. उमेदवारी बाबत मी मुख्यमंत्र्यांकडे निर्णय सोपवला आहे. दोन्ही मतदारसंघातून मी कुठूनही विजयी होवू शकतो. मी राज्यस्तरीय नेता आहे, त्यामुळे मला कुठूनही जबाबदारी दिली. तरी मी निवडून येणार याची मला खात्री आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सतेज पाटीलांनी जमिनी लाटल्या…
पालकमंत्री असताना सतेज पाटलांनी काय केलं ते सांगावं…त्यांनी त्यांच्या संस्थाचा, कॉलेजचा विकास केला. ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची जागा त्यांनी लाटली…. देवस्थानच्या जमिनी त्यांनी लाटल्या… सतेज पाटलांनी पालकमंत्र्यावर आरोप करताना आपल्याकडे चार बोटं आहेत याच भान ठेवावं…बेशूट आरोप करु नये….पालकमंत्री दिपक केसरकर सर्वांना विश्वासात घेवून काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार…
गेल्या 2010 आणि 2015 च्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आम्ही सक्षम असायचो मात्र शेवटच्या दोन दिवसात विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत असे. त्यामुळे दोन्ही निवडणूकांमध्ये आम्हाला अपयश आलं. मात्र येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सर्व बाजूने सक्षम असून महापालिका निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या रणनीतीचा वापर करून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आणि शिवसेनेचा पहिला महापौर मुख्यमंत्र्यांना देणार असेही क्षीरसागर म्हणाले.
शेतकरी संघ वादावर लवकरच निर्णय….
शेतकरी संघाबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आपली भूमिका स्पष्ट करेल असे आश्वासन देऊन चुकीच्या पद्धतीने बेशुट आरोप पालकमंत्र्यावर कोणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
कोल्हापूर शहरासाठी 5 हजार कोटी आणणार….
तसेच, “काँग्रेसने गेल्या 50 वर्षात मतदारांना फसवलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पालकमंत्री काँग्रेसचे झाले. त्यांनी काय केले ? साधी हद्दवाढ करु शकले नाहीत. थेट पाईपलाईनसाठी मी विधानसभेच्या दारात उपोषण केले, त्यानंतर त्यावेळेचे अर्थमंत्री अजित पवारांनी मंजुरी दिली. कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये मंजूर करुन घेतले. त्याचबरोबर अनेक विकास कामे केली आहेत. तर येणाऱ्या वर्षभरात कोल्हापूर शहराच्या विकासासाठी 5 हजार कोटींचा निधी येणं अपेक्षित आहे.” असेही ते म्हणाले.
पंचगंगा नदीत गणेशमुर्तींच विसर्जनाला शासनाने विरोध करू नये….
पंचगंगा नदीच प्रदूषण होवू नये अशी आमची भूमिका आहे. परंतु फक्त गणेश मुर्ती विसर्जनाने प्रदूषण होत नसल्याचा अहवाल आहे. वाहत्या पाण्यात गणेश मुर्तींच विसर्जन कराण्याची लोकांची इच्छा आहे. मग प्रशासन कुणासाठी आहे ? मी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करणार आहे. गणेशोत्सवाला गालबोट लागेल अशी प्रशासनाने भुमिका घेवू नये. पंचगंगा नदीत गणेश मुर्तींच विसर्जन करण्यासाठी प्रशासनाने अटकाव करू नये असे आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.