कोल्हापूर
उदगांव (ता.शिरोळ) येथील उदगांव बायपास महामार्गावरील टोलनाक्यावर असलेल्या बाह्यवळणावर कोल्हापूरहुन सांगलीकडे जाणारा कंटेनर उलटल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. या कंटेनरमध्ये असलेल्या भली मोठी पाईप ही तब्बल १२० फुटांहुन अधिक लांब होती. त्यामुळे उदगांव बायपास मार्गावर काहीवेळ मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. उदगांव बायपास मार्गावर टोलनाक्याच्या बाह्यवळणावर भली मोठी पाईप नेणारा कंटेनरला वळण घेण्यासाठी मार्ग अपूरा पडल्याने हा कंटेनर उदगांव बायपास मार्गावरील असलेल्या खड्यात कोसळली. हा कंटेनर दिवसभर पडून होता.








