चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यामुळे शरीरात अनेक आजार होत आहेत. युरिक अॅसिड देखील त्यापैकी एक आहे. वास्तविक, युरिक अॅसिड हा आपल्या शरीरात साठलेला एक पदार्थ आहे. शरीरातील प्युरीन नावाच्या रसायनाचे विघटन हे त्याच्या निर्मितीचे मुख्य कारण आहे. रक्तामध्ये जास्त प्रमाणात असल्याने ते सांध्यांमध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते, ज्यामुळे रुग्णांना असह्य वेदना, सूज, लालसरपणा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, अशी समस्या उद्भवल्यास काही निवडक पानांचे सेवन नक्कीच लाभदायी ठरू शकते. आपल्या दैनंदिन जेवणखाण्यात वापरली जाणारी ही पाने खाण्यातून पोटात गेल्यास त्यातून युरिक अॅसिड नियंत्रित राहण्याचा सल्ला आरोग्य तज्ञांकडून दिला जातो.

कोथिंबिरीची पाने : शरीरातून युरिक अॅसिड बाहेर काढण्यासाठी कोथिंबीरीची पाने खूप प्रभावी मानली जातात. अनेक प्रकारची औषधे खाऊन कंटाळा आला असेल्यास कोथिंबीरचे सेवन अवश्य करावे. यासाठी कोथिंबीर व्यवस्थित बारीक केल्यानंतर ती पाण्यात मिसळून प्या. असे केल्याने काही दिवसात आराम मिळेल.
कढीपत्ता: युरिक अॅसिड दूर करण्यासाठी कढीपत्ताही परिणामकारक आहे. वास्तविक, कढीपत्ता रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करेल. यामुळे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात. या पानांचे सेवन करण्यासाठी 10 ते 15 पाने एका ग्लास पाण्यात टाकून सुमारे 1 तास राहू द्या. नंतर हे पाणी सेवन केल्याने युरिक अॅसिड नियंत्रित ठेवता येते.

खाऊचे पान : शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी खाऊचे पान खूप प्रभावी मानले जाते. ते युरिक अॅसिड नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पान-सुपारीच्या पानांचा अर्क रक्तातील युरिक अॅसिडचे स्फटिक बाहेर फेकण्याचे काम करतो. अशा परिस्थितीत ही पाने नियमितपणे कच्ची चावून खाल्ली तरी आराम मिळेल.
मेथीची पाने : मेथीची पाने जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जातात. यासाठी मेथीच्या पानांची भाजी, पराठा, पुरी यासारखे पदार्थही तुम्ही बनवून खाऊ शकता. तसेच, ते डिटॉक्स वॉटर किंवा पेय स्वरूपात सेवन केले जाऊ शकते.

तुळशीची पाने : आयुर्वेदात तुळशीच्या पानांपासून अनेक रोगांवर औषधे बनवली जातात. परंतु ते युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी अचूक मानले जातात. तुळशीची पाने नियमितपणे चघळून खाल्ल्यास ते युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते. यासोबतच हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.









